मुंबई : आज रविवार दि. 6 सप्टेंबर इंडियन प्रीमयर लीग सीजन 13 चे अधिकृत वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे. आयपीलएल ची सुरुवात दि. 19 सप्टेंबर पासून होणार असून सलामीचा सामना सायंकाळी साडे सात वाजता मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे.
ज्या शनिवार-रविवार एकाच दिवशी दोन सामने असतील, तेव्हा आधीचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता (यूएईतील स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:00 वाजता) सुरु होईल. तर दुसरा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेसात वाजता (यूएईतील स्थानिक वेळेनुसार 6:00 वाजता) सुरु होईल. तसेच आयपीएलमधील आठ संघात प्राथमिक फेरीत एकूण 46 सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी 24 सामने दुबईत, 20 अबुधाबीत, तर 12 शारजा येथे होतील.





No comments:
Post a Comment